भारताविरोधात चीनचे कारस्थान:नेपाळी संघटनांना भारताविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. ३: चीन नेपाळमधील संघटनांना भारताविरोधात प्रदर्शन करण्यासाठी पैसे पुरवत आहे. गुप्तचर विभागाने सांगितल्याप्रमाणे, चीनने भारतच्या सीमेवर असलेल्या भागांमध्ये काम करणाऱ्या अनेक संघटनांना यासाठी तयार करत आहे. या संघटनांना भारत-चीन सीमा वादाविरोधात प्रदर्शन करण्यास सांगितले जात आहे. यासाठी चीनी दूतावासने नेपाळी संघटनांना 2.5 कोटी रुपये दिले आहेत.

भारत आणि नेपाळदरम्यान, 1700 किमी. लांब सीमा आहे. भारतने लिपुलेखपासून धारचूलापर्यंत रस्ता बनवला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 मे रोजी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे या रस्त्याचे उद्घाटन केले. यानंतर नेपाळने नवीन नकाशा जारी करुन भारताचे तीन भाग नेपाळमध्ये असल्याचे दाखवले. यात लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुराला नेपाळमध्ये असल्याचे दाखवले आहे. दोन्ही देशांमध्ये या तीन भागांवरुन वाद सुरू आहे.

चीनने गोरखा कम्युनिटीवर स्टडी करण्यासाठी फंड दिला

चीनने गोरखा तरुणांवर स्टडी करण्यासाठी काठमांडूच्या एका एनजीओला 12.7 लाख नेपाळी रुपये दिले आहेत. चीन हे माहित करुन घेत आहे की, गोरखा समाजातील तरुण भारतीय सैन्यात भरती का होत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेपाळमध्ये चीनच्या राजदूत होउ यानकीने नेपाळी एनजीओ चाइना स्टडी सेंटर (सीएससी) ला फंड दिला होता.

चीन म्यानमारच्या बंडखोरांना भारताविरूद्ध भडकवत आहे

चीन म्यानमारच्या बंडखोरांनाही हत्यार देऊन भारताविरोधात भडकवत आहे. यातून चीनला पूर्वोत्तरच्या राज्यांमध्ये अशांती पसरवयची आहे. नीदरलँडच्या एमस्टर्डम आधारित थिंक टँक यूरोपियन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (ईएफएसएएस) ने मागच्या महिन्यात जारी आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला होता. त्यात म्हटले की, जुलैमध्ये म्यानमारमध्ये थायलँडच्या सीमेवरील मेइ ताओ भागात चीनी हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला. हे हत्यारं बंडखोर संघटनांना पाठवले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!