चिमुकल्या ‘स्वरा’चा पुन्हा विक्रम; अवघ्या 7 व्या वर्षी ‘कळसुबाई’ शिखर सर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । गोखळी (ता.फलटण) येथील अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकल्या कु.स्वरा योगेश भागवत हिने शिवजयंतीदिनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर करण्याचा विक्रम केला.

विशेष म्हणजे दि. 18 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर जवळील कठीण असणारा हरीहर गड ट्रेक करून दुसर्‍याच दिवशी कु.स्वराने शिवजयंतीच्या निमित्ताने सायं 6 वा.1 मिनिटांनी कळसुबाई शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली व 7 वाजुन 57 मिनिटांनी 1 तास 56 मिनिटात मोहीम पूर्ण केली केले.कुमारी स्वराने वयाच्या 7 व्या वर्षी केलेल्या विक्रमाबद्दल महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी सन्मान केला.

यापूर्वी 10 तासात 143 कि.मी . सायकलिंग, 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुशअप आदी कु.स्वराच्या विक्रमांची ’इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे.


Back to top button
Don`t copy text!