
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मठाचीवाडी गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उद्यानदूत अभिषेक काटे,स्वराज पवार,संकेत कावरे,सुमित भवारी,ऋषिकेश गायकवाड,अविनाश येडे,अथर्व सोनवणे यांनी शाळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचेविषयी व बालदिनाबद्दल माहिती सांगितली .व खाऊ वाटप केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजाराम तांबे, विजय भोसले,सुवर्णा पाटक,विद्याकुमारी मिसाळ इत्यादी शिक्षक उपस्थित होते.