लहानपण देगा देवा रम्य ते बालपण


किती भाबडं, निरागस बालपण
जे होते कालपण,आजपण.
बोबडे बोल अनमोल
चाल तुरु तुरु , शिकवी शहाणपण…

नाही कशाची चिंता
नाही काळजी कशाची
खाणे,खेळणे,झोपणे
पर्वा नाही जगाची…

नाही कामाचं टेन्शन
ना लवकर उठण्याची घाई
चहा,नाष्टा सगळचं आयत
देत असते आई, फक्त आई…

लवलेश नसे अहंकाराचा
माझं, तुझं नसतं ठाऊक
निर्मळ मन,नितळ हस्य
आनंद वाटत, होते भावूक

नसते कशाची अपेक्षा
नाही येत कधी निराशा
लहानपण देगा देवा
हिच छोटी आहे आशा

प्रतिभा मधुकर जाधव.
फलटण, सातारा.


Back to top button
Don`t copy text!