नाशिकमध्ये आईला कोरोना झाल्याचं कळताच मुलाची आत्महत्या


स्थैर्य, नाशिक, दि. १७ : आईला करोना झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या रोकडोबा वाडीत हा धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणाच्या आईला करोनाची लक्षण जाणवल्याने तिला समाज कल्याण कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते. या महिलेचा स्वॅब रिपोर्ट आल्यानंतर तिला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. आईला करोना झाल्याचं या २३ वर्षीय तरुणाला कळल्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!