
स्थैर्य, सातारा, दि. १६ : सातारा शहरातील भाजी मंडई बंद करण्यात आल्या आहेत. करोना आकडा वाढु लागला आहे.त्याचे कसलेही भान राहिले नसल्याचे चित्र अनधिकृत भरत असलेल्या भाजी मंडईत दिसत आहे.यावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्याधिकारी रंजना गगे या स्वतः पहाटे पाच वाजता अतिक्रमण पथकासह रविवार पेठेतल्या मार्केट यार्ड परिसरात पोहचल्या.त्यांना पाहताच अनेक भाजी विक्री करणायांची पळापळ झाली.आवराआवर करत झाकापाक करत त्यांनी गाशा गुंडाळण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली.त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.या कारवाईमुळे सातारच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
सातारा शहरातील आडत व्यापारी करोना बाधित आढळून आल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शहरात भाजी मंडई बंद करण्याचा आदेश काढला.मात्र, नियम हे आमच्यासाठी नसतात.हेच सातारकर नागरिकांचे कायम सूत्र राहिले आहे.काही भाजी विक्री करणायांनी नियम बासनात गुंडाळून रस्त्यावर भाजी विकायला बसत आहेत. युनियन भाजी मंडईच्या बाहेर तीच बाजार समितीच्या बाहेर अवस्था असल्याने त्यावर आवर घालणे गरजेचे आहे.हेच ओळखून मुख्याधिकारी रंजना गगे यांनी पहाटे पाच वाजता अचानक बाजार समितीच्या बाहेर स्टँडच्या समोर भरणाया मंडईला भेट दिली.त्यांना व अतिक्रमण विभागाच्या पथकास एवढय़ा पहाटे पाहताच भाजी विक्री करणायाची तारांबळ उडाली.त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.मुख्याधिकारी रंजना गगे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे सातरकरांनी स्वागत केले आहे.