शहीद जवान कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास पुणे सदर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ यांच्याकडून अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२४ | सातारा |
सातार्‍यातील स्मृती उद्यान येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या अमर जवान स्मृतिस्तंभावर त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल पुष्पचक्र वाहून लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग, युद्ध सेवा पदक, चीफ ऑफ स्टाफ, सदर्न कमांड, पुणे यांनी सन्मानपूर्वक अभिवादन केले. यावेळी वीरमाता कालिंदी महाडिक, कन्या कार्तिकी यांनीही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.

यावेळी सैनिक स्कूल साताराचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सतेश हांगे, निवृत्त कर्नल गिरीधर कोळे, कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरमाता कालिंदी महाडिक, कन्या कार्तिकी, निवृत्त नौसैनिक वर्गमित्र, सोबत काम केलेले शंकर माळवदे तसेच अधिकारी, निवृत्त सैनिक यांनीही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.

यावेळी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या आई कालिंदी महाडिक यांनी माझ्या मुलाचे देशासाठी दिलेले शौर्य व बलिदान न विसरणारे असून युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने व नगरपालिकेने स्मृती उद्यानाचे काम चांगले केले असे सांगून उपस्थितांनी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई व मुलीशी लेफ्टनंट जनरल यांनी संवाद साधला. तसेच स्मृती उद्यानातील उभारण्यात आलेल्या शिल्पांची व वीर सैनिकांच्या नामोउल्लेख असलेल्या पाट्यांची पाहणी केली. ४१ व्या राष्ट्रीय रायफलचे सेना मेडल कर्नल संतोष महाडिक यांना दि. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे दशहतवाद्यांशी लढा देताना वीरमरण आले. कर्नल संतोष महाडीक यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!