स्थैर्य, सातारा, दि.४: हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आर.के.एस भदौरीया यांनी काल म्हणजेच 3 सप्टेंबर 2020 रोजी हवाई युद्ध कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालाला (CAW)भेट दिली. सिकंदराबाद येथे असलेल्या या कॉलेजची स्थापना सन 1959 साली झाली होती. भारतीय हवाई दलाच्या उच्च प्रशिक्षणासाठीच्या या संस्थेत, तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना संयुक्तपणे हवाई युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.
आपल्या भेटीदरम्यान, हवाई दल प्रमुखांनी, 44 व्या उच्च हवाई विभाग अभ्यासक्रम (HACC). करत असलेल्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात येऊ घातलेल्या आव्हांनाची माहिती त्यांनी दिली, अशा परिस्थितीत, हवाई सामर्थ्यांचे महत्व काय असू शकेल आणि येणाऱ्या परिस्थितीत हवाई ताकद कशी वापरता येईल, याचीही माहिती त्यांना दिली. भविष्यातील युद्ध लढण्यासाठी तिन्ही दलांच्या एकत्रित सामर्थ्याचा समन्वयाने वापर करण्यासाठी एकात्मिक बांधणी करण्यावर सध्या काय काम सुरु आहे, याचीही माहिती भदौरिया यांनी प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिली.