मुंबई शहरात नागरिकांसाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष


दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

सर्वसामान्य जनतेला यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करण्यासाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सचिवालयाचा कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक २१ डिसेंबर २०२२ पासून सुरु केलेला आहे. त्यामुळे मुंबईतील ज्या नागरिकांना मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या प्रलंबित कामांबाबत, अडीअडचणी व तक्रारींबाबत अर्ज/निवेदने द्यावयाची असतील त्यांनी ती ‘जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई शहर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!