मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२२ । कोल्हापूर । लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त येथील शाहू मिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कर्यावरील चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आज भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.


यावेळी उपविभगिय अधिकारी वैभव नावडकर, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते. उदय गायकवाड व ऋषीकेस केसकर यांनी चित्र प्रदर्शनाची माहिती दिली. उपसंचालक डॉ. खराट व जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी प्रधान सचिव श्री. खारगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या चित्रप्रदर्शनामध्ये सुमारे 200 दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. राज्यरोहण,कौटुंबिक, परदेश दौरा, शिकार, जनहितार्थ काढलेले आदेश येथे मांडण्यात आले आहेत. शाहू प्रेमी व इतिहास संशोधकांसाठी हा अनमोल ठेवा आहे, असे मत श्री. खारगे यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रदर्शन पहाणीनंतर श्री. खारगे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या स्वरांजली कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तत्पुर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन आदरांजली वाहिली.

 


Back to top button
Don`t copy text!