मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील बहुआयामी आणि भारदस्त नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल शोक भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सरपंच ते मंत्री आणि त्याचबरोबरीने सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग अशा क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच भारदस्त काम उभे केले. त्यांचा अनेक क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांचा आधारस्तंभ म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. कोपरगाव आणि शंकरराव कोल्हे या दोन्ही नावांचा एकमेकांशी अतूट असा बंध निर्माण झाला आहे. व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांची सामाजिक, राजकीय कारकीर्द भारदस्त अशीच होती. त्यांची उणीव निश्चितपणे जाणवत राहील. ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Back to top button
Don`t copy text!