मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ उद्योजक पालोनजी मिस्त्री यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । मुंबई । शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे अध्यक्ष पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या औद्योगिक क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, देशाच्या उद्योगक्षेत्राच्या जडणघडणीत पालोनजी मिस्त्री यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. त्यांनी आपल्या समूहाच्या माध्यमातून विविध उद्योगांची उभारणी केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील या उद्योगांनी देशात गुंतवणूक, रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे होतकरू आणि नव्या दमाच्या तरूणांमध्ये उद्योजकतेची दृष्टी निर्माण होऊ शकली. पालोनजी यांच्या उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकीही जोपासली. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग जगताच्या पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व हरपले आहे. ज्येष्ठ उद्योजक पालोनजी मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Back to top button
Don`t copy text!