स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश साम्राज्याला सातत्याने हादरे दिले. आपल्या अमोघ लेखणीने त्यांनी ब्रिटीश राजवटीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाभाडे काढले. राष्ट्र उभारणी, समाजसुधारणा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. उत्तम संघटक, साहित्यिक – प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


Back to top button
Don`t copy text!