मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी जागवतानाच महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. बलाढ्य राजवट उलथून टाकली अन् भारतीयांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सुर्योदय झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपली लोकशाही आणखी बळकट व्हावी यासाठी महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसा, समता-बंधुता या तत्वज्ञानाचे पदोपदी स्मरण व्हावे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’


Back to top button
Don`t copy text!