
स्थैर्य, गिरवी, दि. ०८ ऑगस्ट : गिरवी (ता. फलटण) येथे कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरित दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बुवासाहेब कदम यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनावर ही कार्यवाही झाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने कृषी मंत्रालय विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनिल कदम यांना ई-मेलद्वारे प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर संशोधन व प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अनिल कदम यांनी समाधान व्यक्त केले आहे.