मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । मुंबई । माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे, मार्गदर्शक असे वाटाड्या व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांची शैलीही अनेकांना भावणारी अशी होती. त्यांनी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाच्या काळात स्वतः प्रयोगशील राहून नव्या पिढीला तंत्रज्ञान, सादरीकरण यातील अनेक पैलूंची ओळख करून दिली. त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्मरणात राहील. त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी वाटाड्या सारखेच होते. ज्येष्ठ माध्यमातज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’


Back to top button
Don`t copy text!