मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत


दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२२ । मुंबई । येथील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. त्यावेळी मंत्रीगण, प्रशासन आणि पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

विमानतळावर उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वागत केले.

यावेळी पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री महोदयांना सलामी देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!