मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत


दैनिक स्थैर्य । दि. ०३ फेब्रुवारी २०२३ । नागपूर । वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी 10.30 वाजता नागपूर विमानतळ येथे विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे होते. नागपूर विमानतळ येथे त्यांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रण्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री शिंदे हे मंत्री दीपक केसरकर यांचे समवेत 11.50 वाजता नागपूर येथून हेलिकॉप्टरने वर्ध्याकडे रवाना झाले.


Back to top button
Don`t copy text!