मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । मुंबई । जी २० परिषद विकास कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

सायंकाळी ४च्या सुमारास मंत्रालयात श्री. कांत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. मुंबईतील पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्री. कांत यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!