मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांना श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । मुंबई । ‘जाज्वल्य अध्यात्मिक, परखड पारमार्थिक अशा धर्मानुरागीचा इहलोकीचा प्रवास थांबला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘धर्मकार्यालाच स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आयुष्य मानले. जाज्वल्य अध्यात्म आणि परमार्थ याबाबत ते परखड विचारांचे होते. त्यांचे उपदेश, विचार पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहतील. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. ओम शांती!


Back to top button
Don`t copy text!