बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाब्यातील पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महाराष्ट्र विधानसभेचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनासाठी विधानभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सकाळी कुलाब्याच्या रिगल चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार सर्वश्री दीपक केसरकर, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, प्रसाद लाड, डॉ. संजय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!