दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसासाठी सातारा जिल्ह्यातील दरे तांब या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या शेताची पाहणी करून स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली तसेच यंत्राद्वारे शेतातील पिकाची मशागतही केली.
गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनी ही एकनाथ शिंदे यांचा उत्साहात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. शेतातील कामे आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक बग्गी मधून गावात फेरफटका मारत गावकऱ्यांसोबत संवाद साधला तसेच त्यांच्या शेतात असलेल्या गवती चहाच्या पिकासह आंब्याच्या बागेची पाहणी केली मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी सकाळी दरेगावात पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्ह्याची आढाव बैठक घेऊन पर्यटन वृद्धीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचा प्रश्न अनेक नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या उद्देशवर देवाची त्यांनी दर्शन घेतली या भागातील पाऊस थांबल्यामुळे हे देवस्थान आता सर्वांसाठी खुले झाले आहे मुख्यमंत्र्यांचे या ग्रामदैवतावर प्रचंड श्रद्धा आहे.