
दैनिक स्थैर्य । 30 मार्च 2025। फलटण । लेखिका डॉ. आम्रपाली कोकरे यांनी ’मल्हार युग’ या पुस्तकाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी कोकरे यांनी या पुस्तकाचा राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याची विनंती केली.
’मल्हार युग’ हे पुस्तक महान मराठा योद्धा सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकते. डॉ. कोकरे यांच्या मते, या पुस्तकातील विचार महाराष्ट्राच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. कोकरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सूचना देण्याचे आश्वासन दिले.
डॉ. कोकरे यांना नुकताच फलटण शहरात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठित राजमाता राणी अहिल्यादेवी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.