दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव तसेच फलटणचे आराध्य दैवत श्री प्रभू श्रीराम व श्री दत्त मंदिर शिखर जीर्णोध्दार शुभारंभ दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. यानिमित्ताने कोळकी गावातील कोणत्याही प्रकारचे चिकन, मटण, मच्छी तसेच देशी व विदेशी मद्य विक्री करण्यास २२ जानेवारीला बंदी केलेली आहे. तसा ठराव कोळकीच्या कोळकीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले यांच्या अध्यक्षतेखाली दि. १९ जानेवारी २०२४ मासिक सभेत ठराव करण्यात आला आहे.
यानुसार चिकन, मटण, मच्छी विक्री दुकाने, मांसाहारी हॉटेल अथवा ढाबा, मांसाहारी खानावळ तसेच देशी-विदेशी दारू विक्रेत्या मालकांनी कोणत्याही प्रकारे आपली दुकाने सुरू न ठेवता बंद ठेवावीत व ग्रामपंचायती सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे मासिक सभेत करण्यात आले आहे.
सदर ठराव अक्षय शामराव गायकवाड यांनी सुचवला व त्यास डॉ. अशोक गेनबा नाळे अनुमोदन केले.
यावेळी कोळकी गावचे उपसरपंच विकास नाळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे, गणेश शिंदे, संजय कामटे, शिवाजीराव भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य स्वप्ना कोरडे, रेश्मा देशमुख, रूपाली चव्हाण, प्राजक्ता काकडे, सोनाली जठार, लक्ष्मी निंबाळकर, वर्षा शिंदे, निर्मला जाधव, विजया नाळे, ग्राम विस्तार अधिकारी रमेश साळुंखे व नागरिक उपस्थित होते.