
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। विडणी । विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्यावतीने आज दि. 14 रोजी सायंकाळी 8 वाजता विडणी पंचक्रोशीतील शिवप्रेमींसाठी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हा ’छावा’ चित्रपटाचे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या स्क्रीनवर आयोजन केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धैर्य, पराक्रम, शौर्य, असामान्य योद्धा या वीर पुत्राचा इतिहास म्हणजे ’छावा’ . धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हा ’छावा’ चित्रपट आहे. या चित्रपटात जबरदस्त संवाद असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे सध्या देशावर गारुड पाहायला मिळत आहे.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्या अप्रतिम भूमिकेने सर्वांच्याच मनावर अधिराज्य केले आहे. त्यांच्या व इतर कलाकारांच्या अभिनय कौशल्याने तत्कालीन शत्रूंना आपल्या परक्रमांनी चित्रपट करणारी छत्रपती संभाजी महाराज यांची देदिप्यामान कारकीर्द रुपये पडद्यावर छावाच्या रूपाने मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण देशाच्या नव्हे तर जगभरात पोहचली आहे.
या चित्रपटाचा आस्वाद घेण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केेले आहे.