छत्रपती शिवेंद्रराजे उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांच्या भेटीला; जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भेट ?


स्थैर्य, सातारा, दि. २४ : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे भेट घेतली. शिवेंद्रराजे व अजितदादा पवार यांच्यात कमरा बंद चर्चा सुरू होती. आगामी काळामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लागणार आहेत. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आमच्या बरोबर येऊन पक्षविरहित जिल्हा बँक ठेवणार आहे, असे स्पष्ट केलेले आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा बँकेमध्ये संपुर्णरित्या पॅनेल टाकले जाणार आहे असेही स्पष्ट केले आहे. आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली आहे का ? असा प्रश्नही आता उपस्थित राहत आहेत.


Back to top button
Don`t copy text!