स्थैर्य, बेळगाव, दि.१: छत्रपती शिवाजी महाराज हे कानडी होते. त्यांचे पूर्वज बेलियाप्पा हे गदग जिल्ह्यातील सोर्तुरचे रहिवासी होते. गदगमध्ये दुष्काळ पडल्यानंतर बेलियाप्पा महाराष्ट्रात गेले. छत्रपती शिवराय हे बेलियाप्पा परिवाराच्या चौथ्या पिढीतील वंशज आहेत, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी उधळली आहेत.
कार्जोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे आणि त्यांच्या नावाचा पक्ष चालवणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंना इतिहास माहिती नाही. यापूर्वी अन्य एक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी तर मुंबईच केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली होती.