छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे इतिहास विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची वर्तमानकालीन प्रस्तुतता’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभागाच्या वतीने रुसा योजना अंतर्गत शिवजयंती महोत्सवानिमित्त दिनांक १७ फेब्रुवारी,२०२३ रोजी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी बीजभाषक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,तुळजापूर येथील श्री. सतीश कदम उपस्थित होते तर चर्चासत्रामध्ये प्रमुख साधन व्यक्ती म्हणून नागमंगलम, मंड्या, कर्नाटक येथील डॉ. एन. जी.प्रकाशा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील डॉ. प्रभाकर कोळेकर आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज येथील डॉ. सुरेश चव्हाण हे उपस्थित होते. सदर चर्चासत्राच्या उदघाटन समारंभप्रसंगी चर्चासत्र समन्वयक डॉ. विकास येलमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून सदर विषयावरील चर्चासत्र आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी प्रमुख साधन व्यक्तींची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभाच्या प्रसंगी बिजभाषक म्हणून उपस्थित असलेले डॉ. सतीश कदम यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकरी विषयक, स्त्री-नीतीविषयक व धार्मिक धोरणांची चर्चा करून त्या धोरणांचा आजच्या राज्यकर्त्यांनी अवलंब करण्याची अपेक्षा व्यक्त केली. चर्चासत्राच्या प्रथम सत्रात डॉ. एन. जी. प्रकाशा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटकातील योगदान या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक सुधारणांचा आढावा घेतला. द्वितीय सत्रामध्ये डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी रयतेचे सबलीकरण करण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी केलेल्या प्रयत्नांचा मागोवा घेतला तर तृतीय सत्रामध्ये डॉ. सुरेश चव्हाण यांनी छ. शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक व आरमार विषयक धोरण विशद करून छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे व विचारांचे आज घरोघरी पठण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांच्या वतीने चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख यानी छ. शिवाजी महाराजांच्या ध्येय-धोरणांची आजच्या काळासाठीची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाच्या अखेरीस शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, पोस्टर सादरीकरण व पोवाडा सादरीकरण स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन
गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. रामचंद्र कुंभार यांनी चर्चासत्रासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले तर प्रा. माधवी गोडसे आणि प्रा. महादेव चिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रामध्ये प्राध्यापक व विद्यार्थी मिळून एकूण १२२ जणांनी सहभाग नोंदवला. सदर चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे, उपप्राचार्या डॉ. रोशनआरा शेख, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने-देशमुख यांनीही आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. बी. मासाळ, रुसा योजनेचे समन्वयक

डॉ. सुभाष कारंडे, इतिहास विभागातील सहकारी प्राध्यापक प्रा. एम. एस. निकम, डॉ. डी. डी. कोरडे, प्रा. एस. टी. ठोकळे, डॉ. एस. व्ही. कदम, प्रा. के. एस. वाघमारे तसेच इतिहास विभागातील विद्यार्थी, इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी, महाविद्यालयातील प्रशासकीय सेवक यांच्या बहुमोल सहकार्यातून हे चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न झाले.
डॉ. विकास येलमार
चर्चासत्र समन्वयक


Back to top button
Don`t copy text!