दैनिक स्थैर्य । दि. ०५ एप्रिल २०२३ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मधील इंग्रजी विभागाने
उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत 'इंग्लिश लैंग्वेज लिटरेचर अँड कल्चर' या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. बीजभाषण करताना मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.शिवाजी सरगर यांनी इंग्रजी भाषा उगम व विकास याविषयी माहिती दिली. साधन व्यक्ती म्हणून कॅनडा येथील टोरंटो विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जेरॉल्ड क्युपचिक म्हणाले की, संस्कृती ही भाषेच्या माध्यमातून दिसून येत
असते. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते व त्यातुनच संस्कृती चे जतन होत असते. त्याबरोबर साहित्याचे वाचन होणे सुध्दा आवश्यक आहे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून संस्कृती संवर्धन करण्याचे
साधन आहे. तिसऱ्या सत्रात तैवान येथील नॉर्मल विद्यापीठाचे प्राध्यापक यॉंगशॉन चॉंग यांनी तेथील असणारे अभ्यासक्रम याविषयी माहिती सांगितली. शिक्षणाच्या माध्यमातून मानवता जपली जावी असे अभ्यासक्रम असणे आवश्यक आहेत, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
त्यावेळी अध्यक्षीय मनोगत किसनवीर महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनील सावंत, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मनीषा पाटील तसेच धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गणेश जाधव
यांनी व्यक्त केले.तसेच सहभागी प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी आपले शोधनिबंधांचे सादरीकरण केले. यावेळी फलटण येथील मुधोजी कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजय दीक्षित, डी.पी. महाविद्यालय कोरेगावचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. भगवान लोकडे तसेच
आटपाडी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. कुलकर्णी यांनी समीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रारंभी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्राध्यापक तानाजी देवकुळे यांनी प्रास्ताविक केले तर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रोशनआरा शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या चर्चासत्रास विविध विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. या चर्चासत्रात उपप्राचार्य डॉ. रामराजे माने-देशमुख, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अनिलकुमार वावरे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. सविता मेनकुदळे तसेच विभागातील प्रा. राजेंद्र तांबिले, प्रा. केशव पवार, डॉ. बाबासाहेब कांगुणे, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. राम गाडेकर, प्रा. ओमप्रकाश पतगे इत्यादी सहभागी झाले.