छत्रपती शाहू महाराजांनी दीनदलितांना न्याय व हक्क मिळवून दिला : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । कराड । सर्वसामान्यांना न्याय मिळावा समान हक्क मिळावा यासाठी समाजातील दीनदलितांना छत्रपती शाहू महाराजांनी बरोबर घेतले आणि त्यांना न्याय व हक्क मिळवून दिला अशी प्रतिक्रीया सहकार पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कराड येथील शाहू चौकात जनतेचे राजे, छत्रपती शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपरिषदेचे आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक किरण पाटील, बाबा कळके, लालासाहेब पाटील, शिवाजी पवार, सतीश भोंगाळे, लालासाहेब देवकर व इतर शासकीय अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील लोकशाही आघाडीचे सरकार छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तमाम जनतेच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करतो असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!