फलटणला साजरा होणार श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि. 12 मे 2025 । फलटण । बुधवार, दिनांक १४ मे २०२५ रोजी फलटण शहरात श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा होणार असून फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यातील जनतेने, कार्यकर्त्यांनी एकत्र येवून या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, ‘‘छत्रपती संभाजी महाराज पुतळा समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा फलटण शहरात उभारला आहे. संभाजी महाराजांच्या आजोळी त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व्हावा हा विचार पुढे आला. त्यानुसार नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हा जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे.’’

‘‘या सोहळ्यादरम्यान सकाळी १० वाजून ५७ मिनीटांनी मुधोजी मनमोहन राजवाडा येथे पाळणा होईल. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पादुका मिरवणुकीने त्यांच्या पुतळास्थळी नेण्यात येतील. त्याठिकाणी त्यांची आरती होईल’’, असे सांगून ‘‘तहहयात हा जन्मोत्सव साजरा होत राहील असा विचार घेवून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेनी या सोहळ्यामध्ये एकत्र सहभागी व्हावे’’, असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!