
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। बारामती । येथील पैलवान ग्रुपतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवशाहीर आविष्कार देशिंगे यांचा शाहिरी पोवाडा आयोजित करण्यात आला. यावेळी बारामती तालुक्यातील गोरक्षक व तब्बल 45 दिवस कठोर बलिदान मास पाळणारे शिवभक्त यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पैलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान आकाश शेरेपाटील, बापू भोसले, प्रदीप शिंदे, दीपक बागल, विठ्ठल आगवणे, महादेव सांगळे, गौरव आगवणे, औदुंबर करे, ऋषिकेश माने, गौरव होळकर, सौरभ भैय्या पवार, अक्षय शेरेपाटील, अक्षय मांडगे, शुभम शेरेपाटील, शुभम पवार अभिषेक मदने, ओंकार मदने, मनोज शेरेपाटील, सोमनाथ शेरेपाटील, प्रशांत जगताप, अभय भाग्यवंत, संकेत आगवणे, ओम शिंदे आदी मान्यवर उपस्थीत होते.
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा त्याग, बलिदान नवीन पिढीस माहीत होण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमा चे आयोजन करणार असल्याचे पैलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै. आकाश शेरेपाटील यांनी सांगितले.