
सातारा – येथील जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती 2025 या प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे (छायाचित्र – अतुल देशपांडे,सातारा)
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : येथील जिल्हा परिषद मैदान येथे दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान छत्रपती कृषी 2025 या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती या प्रदर्शनाचे संयोजक स्मार्ट एक्सपो चे सोमनाथ शेटे यांनी दिली हे प्रदर्शन पाच दिवस दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत सर्वांसाठी पाहण्यास प्रवेशाने सुरू आहे या प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणीचे काम सध्या जिल्हा परिषद मैदान येथे वेगाने सुरुवात असून या प्रदर्शनात 200 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार असून या प्रदर्शनाला संपूर्ण राज्यातून हजारो शेतकरी बांधवांची उपस्थिती राहणार आहे. बुधवार दि. दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
या प्रदर्शनात भारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे एकाच ठिकाणी शेतकरी बांधवांना पाहण्याची संधी मिळणार असून शेती विषयक प्रक्रिया उद्योग यासंदर्भात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेतकर्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने या प्रदर्शनात आपणाला अनुभवता येणार आहेत तसेच फक्त दहा मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह.
प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील नवीन उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोन चे दालन येथे उपलब्ध आहे तसेच शेतीमधील विविध तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने व प्रात्यक्षिक, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन प्रात्यक्षिक, भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातीचे दालन या प्रदर्शनात असणार आहे. याशिवाय हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक पाहायला मिळणार असून दुर्मिळ देशी 500 हुन बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री येथे उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी महोत्सव म्हणूनपरदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तकाचे दालन, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान सौर ऊर्जा विषयी दालने माहिती व प्रदर्शन तसेच गृहोपयोगी वस्तूचे भव्य दालन येथे उपलब्ध करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे.. गिनीज बुक मध्ये नोंद असलेली जगातील सर्वात बुटकी, फक्त 2.8 फूट फुटाची.. राधा म्हैस पाहण्याची संधी या प्रदर्शनात लाभणार आहे तसेच दिनांक 21 नोव्हेंबर रोजी डॉग आणि कॅट प्रेमी साठी… डॉग आणि कॅट शो चे आयोजन सकाळी दहा ते सहा या वेळेत केले असून आणि फॅन्सी ड्रेस कॉम्प्टेशन संपन्न होणार आहे. सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

