दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण भुसार आणि कांदा अडत व्यापारी असोसिएशन बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदी चेतन घडिया, उपाध्यक्षपदी राजेश शहा आ़णि सचिवपदी धिरेन शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
व्यावसायिक स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवणे आणि असोसिएशन बळकट करणे, हे एकच उदिष्ट ठेवून असोसिएशनचे कामकाज करणार असल्याचे अध्यक्ष चेतन घडिया यांनी सांगितले.
या निवडीबद्दल सर्व पदाधिकार्यांचा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचितांचे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, मार्केट कमिटीचे संचालक समर जाधव, उद्योजक राम नाईक निंबाळकर, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजकुमार मेहता, माजी सचिव शशिकांत दोशी, असोसिएशन सदस्य धनेश शहा, सचिन दोशी, सुरेन्द्र दोशी, सनद दोशी, माऊली भोसले, बाळासाहेब वीर, सागर दोशी, राजेंद्र बर्डे, राजेंद्र सूर्यवंशी, बुवासो भोसले, मनसुखलाल शहा, विलास माने, कपिल दोशी, अजितकाका शहा, अजय शहा, प्रमोद जगताप, आदी व्यापारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.