चेस्ट फिजिओथेरपी कोरोना रुग्णांसाठी जीवन संजीवनी ठरत आहे : डॉ. रोहन अकोलकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


  1. चेस्ट फिजिओथेरपी कोरोना काळात फुफुसाचे बळ वाढवण्याचे काम करते – फिजिओथेरपीची व्याप्ती केवळ सांधे, मणके, मेंदूपर्यंत मर्यादित नाही, तर सध्या कोरोनाच्या वैश्‍विक महामारीतही ही ‘चेस्ट फिजिओथेरपी’ उपयुक्त सिद्ध होत आहे. फुफ्फुसांमधील बळ वाढवून, त्यांची क्षमता वाढविण्यासाठी ‘चेस्ट फिजिओथेरपी’ संजीवनी ठरत असून, त्यातून अनेक सकारात्मक परिणाम समोर येत आहेत.
  2. कोरोनाचा प्रसार श्वसन मार्गाने होतो – जगात थैमान घातलेल्या विषाणूचा प्रसार श्वसनमार्गाने होतो. बाधित व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर आघात झाल्याने फुफ्फुसांच्या आतील भागातील आवरण नष्ट होते व त्याजागी नवीन आवरण तयार न होता तेवढा निकामी होतो. ज्याला ‘लंग्स फायब्रोसिस’ असे संबोधले जाते. त्यातून गंभीर झालेल्या रूग्णांना कृत्रिम प्राणवायू (व्हेंटिलेटर) देण्याची गरज पडते.
  3. रुग्णांचे उपचार व पुनर्वसन करण्यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग होतो – फिजिओथेरपी ही केवळ सांध्यांच्या दुखण्याशी निगडित आहे, असे नसून फिजिओथेरपी च्या अनेक शाखा आहेत. मणक्यांचे विकार, लकवा, लहान मुलांचे आजार, मेंदूशी निगडित आजार यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग होतो, तसाच अतिदक्षता विभागातील फुफ्फुसांचे आजार, छातीची शस्त्रक्रिया, हृदयाची शस्त्रक्रिया किंवा श्वसनसंस्थेशी निगडीत आजार असलेल्या रुग्णांचे उपचार व पुनर्वसन करण्यासाठी फिजिओथेरपीचा उपयोग होत आहे. पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन ट्रीटमेंट करणे आवश्यक राहते.
  4. चेस्ट फिजिओथेरपी व्यायामाने रुग्ण लवकर बरा होतो – अशा वेळी सुयोग्य औषध उपचारासाठी रुग्णांना विविध औषधांच्या सहाय्याने वाफ देऊन श्वसननलिका खुली करणे, फुफ्फुसांच्या आतील कफ मोकळे करण्यास मदत, रुग्णाला एका कुशीवर झोपवून, तर कधी पालथे झोपवून चेस्ट फिजिओथेरपी टेक्निक ने छातीतील कफ बाहेर काढला जातो व त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत करणे, हे ‘चेस्ट फिजिओथेरपी’मध्ये समाविष्ट आहे. या पद्धतीने व्हेंटिलेटर सपोर्ट असलेला पेशंट लवकर बरा होतो तसेच ऑक्सिजन सपोर्ट असलेला पेशन्ट सुद्धा लवकरात लवकर बरा होतो.
  5. फुफुसांचे कार्य सुधारण्यास वाव मिळतो – फुफ्फुसामध्ये हवा भरून धरून ठेवणे, छातीच्या स्नायूंची ताकद वाढविणे, प्राणायाम अशा व्यायामांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
    • डॉक्टरांची वैशिष्ट्ये – डॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे बारामतीमधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या FIFA WORLD CUP 2018 रशिया मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ डॉक्टर आहेत. डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण. अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात. जर्मनी टेक्नॉलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर उपकरणे ह्या आणि अश्या अनेक अश्या उपकरणांचा उपयोग करून मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.

    संपर्कासाठी पत्ता – डी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.
    > ओपीडी वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत.
    सोमवार, बुधवार, शनिवार, मोबाईल नंबर – 7350069955


Back to top button
Don`t copy text!