आयपीएलमध्ये चीअरलीडर्स आणि प्रेक्षक दिसणार:रिकाम्या स्टेडियममध्ये टीव्ही स्क्रीनवर रेकॉर्डेड व्हिडिओद्वारे दाखवले जातील चीअरलीडर्स आणि प्रेक्षकांच्या रिअॅक्शन


 

स्थैर्य, दि.१२: यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान यूएईत होणार आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे टुर्नामेंट दर्शकांविना बायो-सिक्योर वातावरणात होणार आहे. परंतू, फ्रेंचाइझीनी रिकाम्या स्टेडियममध्येही चीअरलीडर्स आणि प्रेक्षकांची उपस्थिती दर्शवण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंचायझी रिकाम्या स्टेडियममध्ये मोठ-मोठ्या स्क्रीनवर चाहत्यांच्या रिअॅक्शन आणि चीअरलीडर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. म्हणजेच,टीव्हीवर टुर्नामेंट पाहणाऱ्यांना प्रत्येक चौके आणि छक्यांवर चीअरलीडर्स नाचताना दिसणार आहेत.

संघ आपल्या फलंदाजीदरम्यान चाहत्यांचे रिअॅक्शन दाखवतील

एका फ्रेंचाइझीच्या अधिकाऱ्याने सांगितले की,, ‘‘प्रकृती आणि बायो-सिक्योरला लक्षात घेता स्टेडियम पूर्णपणे रिकामे राहतील. यामुळे काही संघांनी चीअरलीडर्सचे व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. या व्हिडिओंना चौके, छक्के आणि विकेट पडल्यावर दाखवले जातील. तसेच, काही संघांनी चाहत्यांचे रिअॅक्शन रेकॉर्ड केले आहेत, त्यांना फलंदाजीदरम्यान दाखवले जाईल.’’

तीन स्टेडियममध्ये होतील सर्व 60 सामने

आयपीएलमध्ये पहिला सामना डिफेंडींग चॅम्पियन मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान खेळवला जाईल. सर्व 60 सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये होतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!