शरद पवारांना ‘चेकमेट’! प्रफुल्ल पटेलांनी सर्व अधिकार हाती घेतले, अजित पवार विधिमंड़ळ नेतेपदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२३ । मुंबई । अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांकडून कारवाईला सुरुवात होताच, शरद पवारांना चेकमेट दिला आहे. शरद पवारांनी काही मिनिटांपूर्वीच पटेल आणि सुनिल तटकरे यांचे नाव पक्षाच्या नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यावर तातडीने अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी मी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांची विधिमंडळ नेता, प्रदेशाध्यक्ष पदी सुनिल तटकरे आणि प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. अजित पवार विधिमंडळ पक्षाचे नेते यांची निवड झाली आहे. ही नियुक्ती पक्ष करतो. नव्या नियुक्त्यांबाबत विधानसभा अध्यक्षांना कालच कळविले आहे. पक्ष व्हीप नेमतो, त्यानुसार अनिल पाटील यांना महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या प्रतोदपदी नेमले आहे. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. पुढे जी संघटनात्मक कारवाई करायची असेल ती केली जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

पक्षामध्ये ठराविक काळाने निवडणुका व्हाव्या लागतात. त्या झाल्या नव्हत्या. यामुळे आम्ही काही नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली होती. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जयंत पाटील यांना दिली होती. आता कार्यकारी अध्यक्ष या नात्याने मी सुनिल तटकरे यांची निवड प्रदेशाध्यक्षपदी करत आहे. प्रतोद पद अनिल पाटील यांच्याकडेच राहणार आहे, असे पटेल म्हणाले.

तर तटकरे यांनी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, रुपाली चाकणकर – राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष नेमल्याचे जाहीर केले आहे.


Back to top button
Don`t copy text!