वडूज-तडवळे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी डॉ. महादेव पाटील व मान्यवर. (छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. १३ : ग्रामपंचायत सत्तेच्या माध्यमातून पाच वर्षात तडवळे गावचा चौफेर विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन सरपंच प्रतिनिधी डॉ. महादेव पाटील यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या वडूज- तडवळे रस्त्याच्या खडीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच पी.डी. पाटोळे, माजी सरपंच पोपटराव पळे, प्रकाश पळे, धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, विकास साबळे, बाळासाहेब पवार, शंकर पळे, जोतीराम पवार, संजय सापकर, विजय साबळे उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, वित्त आयोगाच्या माध्यमातून तडवळे गावात लाखो रूपयांचा विकास निधी खेचून आणला आहे. आमदार गोरे यांच्या माध्यमातून एक किलो मीटरचे काम होणार आहे. तर उर्वरीत सर्व रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण होणार आहे. या कामाकरीता दोन कोटींपेक्षा जादा निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे. के. काळे यांनी आभार मानले.