दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । येथील चि.चारुदेष्ण कृष्णात बोबडे यांने जवाहर नवोदय परिक्षेत 97.50% गुण मिळवून उज्वल यश संपादन केले. त्याची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे.
या यशासाठी चि.चारुदेष्ण यास श्री क्लासेसचे संचालक श्रीकांत साळुंखे, सौ. प्रियांका साळुंखे, स्व. शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकी च्या मुख्याध्यापिका. सौ. प्रज्ञा काकडे व वर्ग शिक्षिका सौ. लक्ष्मी सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.