हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । सातारा । हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हरिहरेश्वर सहकारी बँकेत ३७ कोटी ४६ लाख रुपयांपेक्षा पेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला. संबंधितांनी संगनमताने बँकेच्या पैशाचा अपहार केला आहे. आरोपींनी स्वतःची अस्तित्वात नसलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून आपले नोकर- चाकर ,मित्रमंडळी, संबंधित यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून बँकेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या विशेष लेखापरीक्षकांनी २९ जणांवर गुन्हा दाखल असून होता.याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ठोस तपास करुन सहा नव्याने आरोपी निष्पन्न केले तर आठ आरोपींना अटक केली होती. यापैकी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर त्यांचे बंधू रमेश खामकर अर्जुन खामकर बँकेचे व्यवस्थापक रमेश जाधव याशिवाय बँकेला सर्च व मूल्यांकन करून देणारे वकील व इंजिनियर यांनाही अटक करण्यात आली होती.याप्रकरणी सहा आरोपी मयत आहेत. ज्या आरोपींकडून तपास पूर्ण झाला अशा आरोपींना च्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अजूनही काही लोकांना ताब्यात घ्यायचे असून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा शोधण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करत आहे .या गुन्ह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने वीस हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन शिंदे करत आहेत.त्यांना विक्रम कणसे, अजित पवार, संजय मोरे, शफिक शेख, संकेत माने आदींना मदत केली. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने ठेवीदारांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे आरोपींची मालमत्ता जप्तीची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केली आहे.


Back to top button
Don`t copy text!