हॉटेल मालक व तेथे जेवणाऱ्या सहा जणांच्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 23 : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाची पायमल्ली करुन सदरबझार येथील बिस्मिला हॉटेल रात्री आठ वाजता उघडे ठेवल्या प्रकरणी हॉटेल मालक व तेथे जेवणाऱ्या सहा जणांच्यावर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिस्मिला हॉटेलवर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केल्याचे समजताच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतर नियम मोडणाऱ्या हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1987 हा मार्च 2020 रोजी पासून लागू केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संसर्ग वाढण्यची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. त्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी यांनी पूर्ण जिह्यात आदेशातील आस्थापना व्यतिरिक्त इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेश काढले आहेत. दि.21 रोजी रात्री 8 वाजता सदरबझार परिसरात पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो. कॉ. संतोष कचरे, पो. शि. धुमाळ, पोलीस शि. घाडगे, भोंग हे पेट्रोलिंग करत होते. त्यांना कसाई गल्लीत सव्वा आठच्या सुमारास बिस्मिल्ला हॉटेल सुरु असल्याचे दिसले. पोलिसांनी तेथे जावून विचारणा केली हॉटेलचे मालक कोण आहेत?, त्यावर तेथे असलेले जहांगिर मकदुल शेख (वय 52, रा. सदरबझार) यांनी बिस्मिला हॉटेल माझे असल्याचे सांगितले. त्यावेळी हॉटेलमध्ये काही जण जेवण करत असताना पोलिसांना आढळून आले. त्यामध्ये अफसर अहमद बेफारी (वय 50), शाहीद हुसेन सौदागर (वय 30), आसिफ बाबूलाल कुरेशी (वय 36), जहाँगिर पिर महमद (वय26), जहाँगिर चाँदसाब शेख (वय 48), शब्बीर कमरुद्दीन जमादार (वय 33, सर्व रा.सदरबझार) असे सांगितले. बिस्मिला हॉटेल सुरु ठेवून पार्सलची सुविधा सुरु असताना हॉटेलमध्ये लोकांना बसवून जेवण सुरु होते. भा.द.वि.स.188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब महाराष्ट्र कोविड 19 अधिसुचनाचा नियम, साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!