स्थैर्य, लोणंद, दि. 08 : लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपर्डे ता खंडाळा गावच्या शिवारात रामोशीवस्ती नजीक असलेल्या माळरानावर अवैध बैलगाडा शर्यत घेण्याच्या प्रयत्न करणारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद नजीक असलेल्या कोपर्डे ता खंडाळा गावच्या हद्दीतील रामोशीवस्ती येथील म्हस्कोबा मंदिराच्या पाठीमागील पडीक जमिनीत बेकायदेशीर रित्या बैलगाडा शर्यती घेण्यासाठी तयार केलेल्या मैदानावर शर्यती करता वापरणारे बैल त्यास जुंपलेले बैलगाडी सह घेऊन डोंगराच्या दिशेने मोकळ्या माळरानाचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांनी आपसात संगनमत करून बेकायदेशीररित्या अत्यंत क्रूरपणे बैलाच्या शर्यतीस बंदी असताना बैलाच्या शर्यती मधून बैलांचा वापर केला. तसेच त्यात लोकांनी कोणीही तोंडाला मास्क घातलेले नसल्याने तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा संदर्भाने माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या सीआरपीसी 1973 चे कलम 144 अन्वय आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उमेश बाळासाहेब पिसाळ राहणार किन्हई तालुका कोरेगाव, बाळासो किसन भोसले राहणार किन्हई तालुका कोरेगाव, सोनल शिंदे पूर्ण नाव माहित नाही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा, अजिंक्य शिंदे पूर्ण नाव माहित नाही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा, अक्षय शिंदे पूर्ण नाव माहित नाही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा, पवन शिंदे पूर्ण नाव माहीत नाही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा, विजय उर्फ भैय्या शिंदे पूर्ण नाव माहित नाही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा, पप्पू माने पूर्ण नाव माहित नाही राहणार कोपर्डे तालुका खंडाळा, बाबुराव शिंदे पूर्ण नाव माहित नाही राहणार कोपर्डी तालुका खंडाळा व इतर 12 ते 15 अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही यांच्यावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची फिर्याद काॅन्टेबल अमोल पवार यांनी दिली असून पुढील तपास बी के पवार करत आहेत.