स्थैर्य, फलटण : विनापरवाना अनअधिकृतरित्या 1200 किलो जनावरांचे मांस आणि दोन जिवंत जर्सी गायची वाहतूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मध्ये 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री 2.30 च्या सुमारास कुरेशीनगर फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला असता इरफान चांद कुरेशी राहणार कुरेशी नगर फलटण (तालुका फलटण) यांनी बोलेरो पिकप क्रमांक एम एच 14 -AS-3686 व टाटा 407 गाडी क्रमांक एम एच 12 CT 9804 मधून आसिफ पीर महंमद शेख, सुफियान रफिक बागवान यांचे मार्फत सुमारे 1200 किलो जनावरांचे मांस व बोलेरो पिकप गाडी क्रमांक एम एच/ 11- BL-1629 मधून दोन जिवंत जर्शी जनावरे याची अज्ञात चालक यांचेमार्फत वाहतूक करीत असताना सुमारे 15 लाख 40 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आलेने यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी 4 लाखाचे 2 बोलेरो पिकअप,10 हजार रुपये किमतीच्या दोन जरशी गाया, 6 लाख किमतीचा 407 टेम्पो, 1 लाख 20 हजार किमतीचे 1200 किलो जनावरांचे मांस, 5000 रु किमतीचे प्रत्येकी 2 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला असून सदरील गुन्ह्याचा अधिक तपास सह्यायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ हे करीत आहेत.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व सपोनि सचिन राऊळ, हवालदार चन्ने, पोलीस नाईक जाधव, शिपाई पिचड, शिपाई कुंभार यांनी केली असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.