जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल


 

स्थैर्य, सातारा, दि. 10 : ठोसेघर येथे जमिनी व्यवहारातील पैसे मागून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश ज्ञानू सपकाळ, किसन हरिबा सपकाळ, प्रकाश मारुती सपकाळ, उत्तम कोंडिबा सपकाळ सर्व रा. जांभे, ता. जि. सातारा अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबत माहिती अशी, ठोसेघर येथील बसस्थानकाच्या समोर चौघा संशयीतांनी अशोक जगन्नाथ काकडे यांना जमिनीच्या व्यवहारातील पैसे कधी देणार असे विचारले. फिर्यादीने आपणास कसलेही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. यावर संशयीतांनी चिडून जावून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अशोक काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!