लोणंद नगरपंचायतीवर स्विकृत सदस्य म्हणून आनंदराव शेळके-पाटील आणि सागर शेळके-पाटील यांची वर्णी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । लोणंद । सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती व भाजपाचे नेते आनंदराव शेळके – पाटील यांची कॉँग्रेसच्या गटनेत्या दिपाली शेळके यांनी दिलेल्या प्रस्तावावरुन तर लोणंद राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सागर शेळके यांची राष्ट्रवादीचे गटनेते शिवाजीराव शेळके यांनी दिलेल्या प्रस्तावावरून लोणंद नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली.

लोणंद नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक व सभापती निवडीसाठी  प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी कॉंग्रेसकडून दिलेल्या प्रस्तावावरुन भाजपाचे नेते आनंदराव शेळके – पाटील यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली.  त्यांच्या निवडीला भाजपा नगरसेविका दिपाली शेळके, ज्योती डोनीकर,अपक्ष नगरसेविका, राजश्री शेळके यांनी लेखी पत्राने पाठिंबा दिला आहे यावेळी सर्फराज बागवान, राहुल घाडगे, प्रविण व्हावळ, दिपाली निलेश शेळके, दिपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, आसिया बागवान, ज्योती डोनीकर,निलेश शेळके, संदीप  शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडुन दिलेल्या प्रस्तावावरुन सागर शेळके यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कोविड समन्वय समिती सदस्य डॉ नितीन सावंत, नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे , उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके,भरत शेळके, रविंद्र क्षीरसागर, सचिन शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, राशिदा इनामदार, सीमा खरात, रशिदा इनामदार, हणमंत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर सायंकाळी स्थायी समितीच्या निवडी घेण्यात आल्या त्यामधे स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी शिवाजीराव शेळके- पाटील, रवींद्र क्षीरसागर, सुप्रिया शेळके व सागर शेळके यांची निवड करण्यात आली. स्वच्छता, वैद्यकीय, आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके- पाटील यांची निवड करण्यात येऊन सदस्यपदी गणीभाई कच्छी, सीमा खरात, प्रवीण व्हावळ व ज्योती डोणीकर यांची निवड झाली आहे.

बांधकाम नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी रवींद्र क्षीरसागर यांची निवड करण्यात येऊन सदस्यपदी भरत शेळके, रशिदा इनामदार, दीपाली नीलेश शेळके व तृप्ती राहुल घाडगे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सुप्रिया गणेश शेळके यांची निवड करण्यात आली, तर सदस्य म्हणून सचिन शेळके, भरत बोडरे, आसिया बागवान व दीपाली संदीप शेळके यांची निवड करण्यात आली तर महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद रिक्त राहिले आहे. या समितीच्या सदस्य म्हणून रशिदा इनामदार, सीमा खरात, राजश्री शेळके व तृप्ती घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!