दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । सातारा । पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पाचगणी ता. महाबळेश्वर गावचे श्री. घाटजाई देवी यात्रा उत्सवानिमित्त दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (1) (ब) प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरुन दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीचे ००.०० वा. पासुन ते दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजीचे 24 वा. पर्यंत वाहतुक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
वाहतुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे
महाबळेश्वर बाजुकडुन वाई बाजुकडे जाणारी वाहतुक : एसटी स्टॅन्ड चौक पाचगणी मार्गे – राहिल प्लाझा- टेबल लॅन्ड कॉर्नर – अपना हॉटेल- भिमनगर – जुने पोलीस ठाणे ते मेन रोड.
वाई बाजुकडुन महाबळेश्वर बाजुकडे जाणारी वाहतुक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान – चेसन रोड शॉलम हायस्कुल- न्यू ईरा हायस्कुल मार्गे – रश्मी चौक मेन रोड .
अवडज वाहनासाठी वाहतुक मार्ग वेळ सकाळी 11.00 ते रात्रौ 00.00 वा पर्यन्त
महाबळेश्वर वरुन वाई – पुणे बाजुकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतुक संजीवर नाका मार्गे करहर-कुडाळा-पाचवड .
महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतुक पाचवड मार्गे – कुडाळ- करहर – संजीवन नाका महाबळेश्वर अशी करण्यात येत आहे.
तरी वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.