फलटण शहरास लागून असलेल्या बाणगंगा नदीवरील पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल


दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । बाणगंगा नदीवर फलटण शहरास लागून पुलाचे काम प्रगतीत  असून अस्तित्वातील पुलाचे भराव लागून असल्याने नवीन पुलाचे  काम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार 10 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2022 पर्यंत दोन महिने वाहतुकीस अस्तित्वातील पुल बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटणचे उप अभियंता यांनी दिली आहे.

या रस्त्यावरील वाहतुक वाठार निंबाळकर फाटा वडजल ते नाना पाटील चौक रस्ता या मार्गाने तसेच मिरगाव निंभोरे नाना पाटील चौक अशी दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!