
स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सातारा शहरातील नवीन एम.आय.डी.सी. हद्दीत डी.एम.ओ. गोडावून येथे सातारा नगरपरिषद निवडणुक 2025 अनुषंगाने मतमोजणी होणार आहे. त्यानुसार वेणुगोपाल फुड्स ते बाबा फुडस कंपनी युनिटकडे डी.एम.ओ. गोडावुन समोरुन जाणारा रस्ता हा वाहतुकीसाठी रविवार, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत बंद करणेत येणार आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वाहतुक व्यवस्थेत बदल केले आहेत.
वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग- वेणुगोपाल फुड्स ते बाबा फुडस कंपनीकडे डी.एम.ओ.गोडावुन समोरुन येणारे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना (शासकीय वाहने वगळून) येणे जाणेस बंदी करणेत येत आहे.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग- समर्थ हॉस्पिटल येथुन कुपर कंपनी जे-2 युनिट जवळुन एम.आय.डी.सी. मध्ये जाणारी वाहने ही वेणुगोपाल फुडस प्राय.लि. कंपनीपर्यंत जातील. भोर फाटा येथून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बाबा फुड्स कंपनी पर्यंत जातील.
