फलटण बाजार समितीच्या कामकाजात बदल


दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । उपविभागीय अधिकारी,फलटण यांचेशी झालेल्या चर्चेस अनुसरुन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात बदल झाले असून यानुसार शनिवारी व रविवारी भुसार, फळे भाजीपाला शेळी मेंढी आणि जनावरे बाजार पूर्णपणे बंद राहील. भुसार आवक बुधवारी उतरवून घेतली जाईल व गुरुवारी भुसार लिलाव होतील. कांदा आवक सोमवारी उतरवून घेतली जाईल व कांदा मार्केट लिलाव मंगळवारी होतील. लिलाव कामकाज सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच पूर्ण करावयाचे असून मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. याची नोंद र्व शेतकरी बंधू,अडते ,खरेदीदार, हमाल व मापाडी,वाहतूकदार व इतर घटकांनी घ्यावी, असे आवाहन बाजार समितीच्या मार्फत करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!