
दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ सांगवीचे अध्यक्ष नानासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरंग रामचंद्र तावरे यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा. रवींद्र कोकरे सर यांनीही आपल्या अस्सल बोली शब्दांमध्ये ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ज्येष्ठांनी दोन खडे जवळ बाळगल्यस उर्वरीत जीवन सुखावह जाईल. डोक्यावर बर्फ व मुखात खडीसाखर हाच रामबाण उपाय आहे. चंदूकाका सराफ पतपेढी विश्वासाचे दुसरे नाव आहे, असे मत कथाकार प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी विजय तावरे यांनीही उपस्थित ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. हनुमंत एजगर, श्री.अंकुश शिंदे, श्री. कृष्णाराव शितोळे, श्री. दत्तात्रय निंबाळकर, श्री. नानासाहेब तावरे, श्री. रवींद्र तावरे, श्री. बाळासाहेब तावरे, श्री. कृष्णा राव तावरे, श्री. मारुती शिर्के, श्री. साहेबराव तावरे, श्री. गणपतराव दीक्षित, श्री. प्रकाश आलेकरी, श्री. मारोतराव कादवाने, श्री. गोविंद तावरे, श्री. रघुनाथ तावरे, श्री. हनुमंत तावरे, श्री. खंडेराव तावरे, श्री. तानाजी जाधव सर, श्री. नानासाहेब देशमुख, श्री. जगन्नाथ शिवकुले, श्री. जगन्नाथ तावरे, श्री. चंद्रराव तावरे, श्री. धनसिंग तावरे, सुभाष तावरे, श्री. रघुनाथ तावरे, श्री. बाळासाहेब तावरे, श्री. बाबुराव सालगुडे, श्री. वीरसिंग तावरे, श्री. ध्रुवकुमार सालगुडे, श्री. शिवाजी तावरे, श्री. शामराव येजगर इत्यादी सर्व ज्येष्ठ उपस्थित सर्वांचा चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने शाल व एक रोप देऊन सन्मान केला.
यावेळी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी धनंजय माने, विनोद जगताप, सचिन जाधव, निखिल कोकरे, प्रवीण काळे सर उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थित यांचे तावरे परिवाराच्यावतीने माजी सरपंच वर्षा तावरे यांनी आभार मानून उपस्थित यांना स्नेहभोजनाचा आस्वाद दिला.